शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयात जागा नाही, कोविड सेंटरही फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात खासगी व सरकारीसह एकूण ३२ रुग्णालये आहेत. ही सर्व रुग्णालये मिळून एकूण ...

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात खासगी व सरकारीसह एकूण ३२ रुग्णालये आहेत. ही सर्व रुग्णालये मिळून एकूण १ हजार ६०६ बेड असून, रविवारपर्यंत १२५६ बेड फुल्ल असून, केवळ ३५० बेड रिकामे होते.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रिकामे असलेले बेडही तत्काळ फुल्ल होऊन जात आहे. कोरोनाची बाधा झाल्याबरोबरच नातेवाईकांची रुग्णालयांमध्ये बेड मिळविण्यासाठी धावपळ सुरू होत असते. पैसे मोजूनही काही ठिकाणी बेड, ॲाक्सिजन मिळत नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे.

कोविड सेंटरमध्येही लवकर बेड मिळेना

रुग्णाचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर ज्याच्याजवळ पैसे आहे ते खासगी रुग्णालयात जात आहेत. मात्र सर्वसामान्य परिस्थिती असलेल्यांना कोविड सेंटरचाच आधार आहे. मात्र त्या ठिकाणीही लवकर बेड मिळत नाही.

रुग्णांना सौम्य लक्षणे तरीही रुग्णालयात

अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात येतात. मात्र काहीजण उपचार रुग्णालयातच झाले पाहिजे म्हणून रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. तसेच काही ठिकाणी घरे लहान व विलगीकरणासाठी स्वतंत्र जागा नसल्याने, नाईलाजास्तव रुग्णांना रुग्णालय अथवा कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागत आहे. एकाचवेळी शहरातील शंभर, दीडशे जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह येत असून, हे सर्वजण रुग्णालयात धाव घेतात.

रुग्णांची बेड मिळविण्यासाठी वणवण

बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला खासगी अथवा शासकीय रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू होते. अनेक ठिकाणी फोन करूनही बेड नसल्याचेच सुरवातीला सांगण्यात येत असते. यातच रुग्णाच्या नातेवाईकांचा बराच वेळ वाया जात असतो.