शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:58 IST

कर्ले सजा : कार्यालयाचे ठिकाण वारंवार बदलले जाते; योजनांपासून खातेदार वंचित

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील कर्ले सजेचा तलाठी उपलब्ध होत नाही तसेच कार्यालयाचे ठिकाणही वारंवार बदलत असल्यामुळे सजेतील खातेदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाच्या योजना सुरू असल्यामुळे मुदतीत कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकरी वणवण फिरत आहेत.मौजे कर्ले सजेत कलवाडे, कर्ले, परसोळे, अक्कलकोस आदी गावांसह मालपूर गावातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या या सजेत शेतजमीनी आहेत. मात्र येथील सजेचा तलाठी वेळेवर कधीच भेटत नसल्याने खातेदार शेतकरी सांगतात.दूरध्वनीवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल किंवा स्वीच आॅफ असल्याचा आवाज कानावर पडत असल्यामुळे शेतकरी दिवसभर कार्यालयाबाहेर थांबून परतत असल्याचे सांगतात.आधी या सजेचे तलाठी कार्यालय मालपूर येथे होते. नंतर कर्ले गावात नेण्यात आले. तेथून दोंडाईचा येथे आहे. मात्र येथे सुद्धा दोन ठिकाणी जागेत बदल झाल्यामुळे शेतकरी मात्र इकडेतिकडे हिंडतांना दिसून येत आहेत. कुठललीही पूर्व सूचना व माहिती न देता जागेत बदल होत असल्यामुळे शेतकºयांची खूप मोठी गैरसोय होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष घालावे.सध्या शासनाच्या दोन योजना सुरु असून सन २०१८-१९ चे दुष्काळी अनुदान व प्रधानमंत्री शेतकरी सन्माननिधी याचा लाभ घेण्यासाठी सर्वच शेतकरी आपआपल्या तलाठ्यांच्या शोधात आहेत.मात्र कर्ले सजेचा तलाठी सहज सापडत नसल्यामुळे या सजेचा खातेदार पूर्णपणे वैतागला आहे.२६ फेब्रुवारी या मुदतीेत घोषणापत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, ८ अ, सातबारा, आपला मोबाईलनंतर आदी कागदपत्रे जमा करावयाची गरज असल्यामुळे सध्या शेतकरी वणवण फिरत आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावून सर्व गावांचा विचार करता सोयीच्या मालपूर गावी कर्ले सजेचे तलाठी कार्यालय कायमस्वरुपी करावे, अशी शेतकरी मुकेश उपासनी, पंडीत पाडील, दामोदर माळी, नामदेव अहिरे, शरद वाघ आदींसह शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे