स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण व शाईफेक 

By भुषण चिंचोरे | Published: March 21, 2023 02:38 PM2023-03-21T14:38:41+5:302023-03-21T14:38:56+5:30

फडतरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीत घडली.

Swayambhu company manager was beaten and slapped by NCP workers | स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण व शाईफेक 

स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण व शाईफेक 

googlenewsNext

भूषण चिंचोरे

धुळे: महानगरपालिकेच्या स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या स्वयंभू कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत फडतरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीत घडली. शहरातील स्वच्छतेबाबत राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले व कार्यकर्ते फडतरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते.

यावेळी फडतरे व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला त्यानंतर कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले अंडी व शाई फडतरे यांच्या अंगावर फेकली तसेच मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Swayambhu company manager was beaten and slapped by NCP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.