शिंदखेडासह साक्री तालुक्यात दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:53 IST2019-11-24T22:51:49+5:302019-11-24T22:53:01+5:30
निरगुडी आणि उभंड येथील घटना, गावात हळहळ

शिंदखेडासह साक्री तालुक्यात दोघांची आत्महत्या
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील भीमसिंग गुलाबसींग गिरासे (वय ७०) यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना रविवारी पहाटे चार वाजता उघडकीस आली.
निरगुडी येथील भीमसिंग गुलाबसींग गिरासे त्यांच्या पत्नीसह राहत्या घरात झोपले होते़ त्यात पहाटे ४ वाजता त्यांची पत्नी झोपेतून उठली तेव्हा त्यांना पती घराच्या सºयाला दोराने गळफास घेऊन लटकलेले दिसले़ त्यांच्या पत्नीने लगेच शेजारील माजी सरपंच खडकसिंग गिरासे यांना सांगितले़ त्यांनी लगेच शिंदखेडा पोलिसात फोन करुन लागलीच रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले़ मयत भीमसिंग यांच्यावर जिल्हा बँकेचे व सोसायटीचे २०१७ पासून सुमारे ८० हजार रुपयांचे कर्ज होते तसेच तीन एकर क्षेत्रात अति पावसाने कपाशी पीकही हातचे गेल्याने कर्ज फेडून पोट कसे भरावे, अगोदरच मुले त्यांचे दोन मुले आपल्या उदरनिर्वाहसाठी गुजरातमध्ये हिरे कारखान्यात कामाला गेली़ त्याचेच पोट जेमतेम भरत असल्याने सर्व मदार कपाशीवरच होती़ मात्र, तीच वाया गेल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरु होती़ अधिक तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत़
उभंड येथेही घडली दुर्घटना
साक्री तालुक्यातील उभंड येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी सकाळी साडेसात वाजेपुर्वी घडली आहे़
साक्री तालुक्यातील उंभड येथील खंडू सुकलाल पाटील (४५) याने आपल्या राहत्या घरी इलेक्ट्रिक सर्व्हीस वायरने गळफास घेऊन आत्महत्याची केल्याची घटना घडली़
याप्रकरणी धनराज सुकलाल पाटील यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ त्यानुसार २३ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ खंडू पाटील यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही़ पोलीस तपास सुरु आहे़