वेतन आयोगाचा हप्ता खात्यावर जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:25 AM2019-11-21T11:25:30+5:302019-11-21T11:25:53+5:30

महाराष्टÑ पुरोगामी शिक्षक संघटना : विविध मागण्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Submit the salary commission premium to the account | वेतन आयोगाचा हप्ता खात्यावर जमा करा

वेतन आयोगाचा हप्ता खात्यावर जमा करा

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत
धुळे :प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. या वेतन आयोगाचा पहिला हप्ता शिक्षकांच्या पीएफ खात्यावर लवकर जमा करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना देण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसदर्भात शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात सातव्या वेतनआयोगातील फरकाचा डीसीपीएसधारकांना (अंशकालीन पेंशन योजना) रोखीने देण्यात येणारा पहिला हप्ता त्वरीत देण्यात यावा, डीसीपीएस धारकांच्या दरमहा होणाºया कपातीचा हिशोब संबंधिताना देण्यात यावा, पदोन्नती मुख्याध्यापक व विषय शिक्षकांची लवकर नेमणुक करण्यात यावी, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेत समाविष्ट करावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, राज्य प्रमुख संघटक व जिल्हा सरचिटणिस भुपेश वाघ, प्रभाकर चौधरी, रविंद्र देवरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत महाले, शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष विलास थोरात, जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सोनवणे आदी उपस्थित होते. दरम्यान सर्वच प्रश्न लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासन मनीष पवार यांनी दिले आहे.

Web Title: Submit the salary commission premium to the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.