विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:23+5:302021-06-16T04:47:23+5:30

निवेदनात म्हटले आहे की, दहावीच्या अंदाजे १६ लाख व बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा ...

Student examination fees should be canceled | विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करावे

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करावे

Next

निवेदनात म्हटले आहे की, दहावीच्या अंदाजे १६ लाख व बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क शिक्षण विभागाकडे जमा केले होते. जे अंदाजे १४० कोटींच्या घरात होतात. परीक्षाच झाली नाही तर त्यावर होणारा खर्च झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जमा केलेली शुल्काची रक्कम त्यांना या कठीणप्रसंगी परत करावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजिका डॉ.कल्पना पांडे व पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव व आयुक्त यांना पाठविले आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा उत्तरपत्रिकेचा, प्रश्नपत्रिकेचा खर्च, परीक्षा पर्यवेक्षकांचा खर्च, व्हॅल्युअर, माॅडरेटर, केंद्र संचालक, केंद्रप्रमुख, कस्टोडिअन यांचे मानधन, प्रवास भत्ता, पोस्टेज, अनेक प्रकारच्या स्टेशनरीचा खर्च, भरारी पथकाचा खर्च, अशाप्रकारे परीक्षा व मूल्यमापनाशी संबंधित सर्व प्रकारचे खर्च झालेले नाहीत. राज्यातील विद्यार्थ्यांचा मानवीय दृष्टिकोनातून विचार करून, परीक्षाच रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क तात्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी राज्य संयोजक डॉ.कल्पना पांडे, अनिल शिवणकर, नाशिक विभाग संयोजक महेश मुळे, भरतसिंह भदोरिया, प्र.ह. दलाल, ईश्वरभाई पटेल, निशिकांत शिंपी, अरविंद आचार्य, मनोहर चौधरी, महेंद्र फटकळ, अविनाश पाटील, दिनेश देवरे आदींनी केली आहे.

Web Title: Student examination fees should be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.