शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याचा धुळ्यात तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST

धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी गावात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद ...

धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी गावात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत. भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतर्फे नुकतीच निदर्शने करण्यात आली. अंत्ययात्रा अडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, माळेवाडी, जि. सोलापूर येथे मातंग समाजाचे पनाजी अनंता साठे यांची अंत्ययात्रा पाेलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून अडविण्यात आली. पाेलिसांत दिलेली तक्रार मागे घेत असल्याचे लेखी द्या, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी मृताचे नातेवाईक साठे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अंत्ययात्रा अडवण्याच्या ठिकाणी पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पाेलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी उपस्थित हाेते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी हा प्रश्न सोडविण्याची गरज होती. पण त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करावी, पीडितांना संरक्षण द्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अधिकारांचा गैरवापर करणारे पाेलीस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, प्रदेश सरचिटणीस महेंद्र खैरनार, नगरसेवक नागसेन बाेरसे, विनायक अहिरे, प्रकाश पाेळ, माेहित चित्ते, मनुकुमार गाेयर, वानखेडकर, गणेश आगलावे, विक्की थाेरात, बंटी मंगळे आदी सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.