धुळ्यात 'MD' ड्रग्जचा साठा जप्त! स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:32 IST2025-09-26T12:30:39+5:302025-09-26T12:32:01+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ड्रग्जसह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळ्यात 'MD' ड्रग्जचा साठा जप्त! स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे: शहरात प्रथमच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत 17 लाख रुपये किमतीचे एमडी (MD) ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे धुळे शहरात खळबळ उडाली आहे. एमडीसारखे महागडे आणि घातक ड्रग्ज शहरात कोणासाठी आणले जात होते, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ड्रग्जसह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
* सैय्यद अतिक सैय्यद (रा. मालेगाव)
* मजहर खान युसूफ खान (रा. राजस्थान)
हे ड्रग्ज धुळ्यामध्ये कोणाला विकले जाणार होते किंवा कोणत्या मोठ्या रॅकेटचा हा भाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत आहे. पोलीस या ड्रग्जच्या साखळीतील इतर लोकांचा आणि मुख्य सूत्रधाराचा कसून शोध घेत आहेत.