शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:12 IST

बंडखोरीच्या भीतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर न करण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे.

धुळे -  महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला असून याठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत युती होणार आहे. सोमवारी रात्रीपर्यंत महायुतीच्या बैठकांचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिंदेसेना-अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शेवटपर्यंत भाजपाने त्यांचे पत्ते खुले केले नसले तरी त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. 

बंडखोरीच्या भीतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर न करण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेस, उद्धवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागावाटप निश्चित झाले असून महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. एकूण ७६ जागांपैकी काँग्रेस २५, उद्धवसेना-मनसे ३५ तर शरद पवारांची राष्ट्रवादी १४ जागांवर निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे भाजपाने युतीसंदर्भात काहीच स्पष्ट न केल्याने शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली. महापालिका निवडणुकीत एमआयएम २३ जागांवर उमेदवार उभे करत असून आणखी काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. 

भाजपात यादीपूर्वीच 'मातब्बरांचे' पत्ते कट?

भाजपाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली नसली, तरी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांचे तिकीट कापले गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये माजी महापौरांसह काही ज्येष्ठ माजी नगरसेवकांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

निष्ठावंत विरुद्ध आयाराम इच्छुकांचा होतोय संताप

भाजपाच्या सर्व बैठका, आंदोलने आणि पक्षीय कार्यक्रमांना न चुकता उपस्थित राहणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तीव्र नाराजी आहे. "आम्ही वर्षानुवर्षे पक्षाचे काम केले, पक्ष वाढवला; मात्र जे कधी बैठकीला फिरकले नाहीत किंवा जे दुसऱ्या पक्षातून नुकतेच दाखल झाले आहेत, त्यांना तिकीट देऊन सन्मानित केले जात आहे," अशी खदखद अनेक इच्छुकांनी खासगीत बोलून दाखवली आहे.

पक्षादेश शिरसावंद्य..

तिकीट कापल्याची चर्चा असली, तरी काही इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षात नाराजी असली तरी आम्ही शिस्तप्रिय कार्यकर्ते आहोत, त्यामुळे पक्षादेश शिरसावंद्य मानू," अशी अधिकृत प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Dhule Municipal Corporation Electionधुळे महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार