शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रोकडसह दागिने घेऊन चोरटा पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:03 IST

कुंडाणे शिवार : सीसीटीव्ही फिरवित बंगल्यात केला प्रवेश, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बंगल्याच्या मागील बाजूस असलेला सीसीटीव्ही कॅमेराची दिशा फिरवित वॉल कंपाऊंडची जाळी कापत आतमध्ये शिरलेल्या चोरट्याने रोकडसह दागिने लांबविले़ घरफोडीची ही घटना धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारात योगेश पाटील यांच्या घरात गुरुवारी पहाटे घडली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला़धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारात योगेश गोविंद पाटील (२७) या तरुण शेतकऱ्याचा गावात बंगला आहे़ बुधवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर त्याचे आई-वडील, पत्नी आणि योगेश हे आपआपल्या खोलीत झोपायला निघून गेले़ हे झोपल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूची जाळी कापली़ आतमध्ये प्रवेश करीत मागच्या दरवाजाची कडी कोंडा तोडला़ त्यानंतर चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली दीड लाखांची रोकड, ८० भार वजनाच्या चांदीच्या वस्तू, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला़योगेश याचे वडील रात्री १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले़ त्यामुळे त्यांनी घरातील लोकांना उठविले़ घराची तपासणी केली असता रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लांबविले असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले़घरात चोरी झाल्याची माहिती योगेश पाटील यांनी धुळे तालुका पोलिसांना कळविली़ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक काळे, राजपूत आणि पोलिसांचे पथक पाठोपाठ श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी घटनास्थळ गाठले़ घराची तपासणी केली असता सीसीटीव्ही फिरविले असल्याचे दिसून आले़चोरटे हे माहितगार असावेत असा अंदाज पोलिसांचा आहे़ सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला आहे़