शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बसस्टॅण्डला अतिक्रमणाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:32 IST

शिरपूर तालुका : वाडी स्थानक बनले अस्वच्छतेचे आगार, दुरवस्थेने प्रवासी त्रस्त

बभळाज : शिरपूर तालुक्यातील वाडी येथील प्रवासी निवारा शेडला खाजगी दुकानदारांनी दुकाने थाटून अतिक्रमणाचा वेढा दिला आहे. तसेच बस स्थानक अस्वच्छतेचे आगरही बनले असून येथे प्रवाशांना उभे राहणे देखील शक्य नाही, अशी अवस्था झाली आहे. येथे नवीन प्रवासी शेड बांधण्यात यावे, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.वाडी हे गाव शिरपूर-बोराडी रस्त्यावरील मोठे व महत्वाचे स्थानक असून हे गाव वाडी बु।।व वाडी खुर्द असे विभागले गेले आहे. मात्र, दोन्ही गावांचा प्रवासी थांबा एकच आहे. दोन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या सुमारे ७ हजारापर्यंत आहे. या गावाच्या पंचक्रोशीतील चांदसे, चांदसुर्या, जुने चांदुसुर्या, वाघबर्डी, वासर्डी इत्यादी गावातील प्रवाशांना वाडी येथे येऊनच पुढील प्रवासाला जावे लागते. तसेच या सर्व गावातील महाविद्यालयीन विद्यार्थीही वाडी येथून मार्गस्थ होत असतात. या सर्व प्रवाशांची येथील पडक्या प्रवासी थांब्यामुळे गैरसोय होत आहे. प्रवाशांना निवारा शेडमध्ये कचरा घाणीचे साम्राज्य असल्याने परिसरातील टपºया, चहाच्या हॉटेलचा आसरा घ्यावा लागत आहे. प्रवासी थांब्याच्या सर्व बाजूंनी खाजगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने बºयाचदा बाहेरगावच्या प्रवाशांना सदर प्रवासी निवाराशेड दिसत नाही. म्हणून प्रवासी थांब्याच्या जवळ असलेले अतिक्रमण त्वरित काढून प्रवाशांची कुंचबणा थांबवावी. तसेच याच जागेवर नवीन प्रवासी थांब्याचे बांधकाम करण्यात यावे अथवा याच शेडची संपूर्ण दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशी व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत सदर रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी उपविभाग क्र.१ कडे असून रस्त्याशी संबंधित दोन्ही कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या विभागाने सदर बस थांब्याच्या भोवती असलेली अतिक्रमण काढण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :Dhuleधुळे