धक्कादायक! पतीनेच पत्नीसह मुलाला पाजले सॅनिटायझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 05:49 IST2020-08-06T05:47:28+5:302020-08-06T05:49:08+5:30
दिपा राऊळ यांनी धुळ्यात फिर्याद दिली आहे. पती रावसाहेब राऊळ याने मारहाण, शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

धक्कादायक! पतीनेच पत्नीसह मुलाला पाजले सॅनिटायझर
धुळे : नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या धुळ्यातील एका कुटुंबाचा कलह विकोपाला गेला असून घर सोडून जावे यासाठी पतीने
पत्नीला आणि मुलाला सॅनिटायझर पाजल्याची घटना समोर आली आहे़
दिपा राऊळ यांनी धुळ्यात फिर्याद दिली आहे. पती रावसाहेब राऊळ याने मारहाण, शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.