शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

आजपासून सुरु होणार शिवशाही बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:23 PM

जळगाव-धुळे : मार्गात असणार दोन ठिकाणी थांबे, सामान्य प्रवाशांनाही लाभ

धुळे :राज्य परिवहन महामंडळात दाखल झालेली शिवशाही बससेवा अनेक मार्गावर सुरु आहे़ यात धुळे ते जळगाव मार्गावर विनावाहक सेवा सुरु होऊन बंद झाली होती़ यानंतर आता नव्याने जळगाव - धुळे मार्गावर शिवशाही बससेवा सुरु करण्यात येणार आहे़ यात आता वाहक राहणार असून काही महत्वाच्या गावांचे थांबे देखील देण्यात येणार आहे़ राज्य परिवहन महामंडळातर्फे आरामदायी बससेवा शिवशाही नावाने दाखल करण्यात आली आहे़ या बहुचर्चित शिवशाही बस आरामदायी बैठक व्यवस्था, पूश बॅक, एसीसह सीसीटीव्ही कॅमेरे, एअर सस्पेन्शन शॉकअप असून बसची आसन क्षमता ४३ इतकी आहे़ या सुविधांमुळे प्रवाश्यांचा लांब पल्याचा प्रवास आरामदायी होतो़ ही शिवशाही बससेवा जळगाव - पुणे मार्गावर सुरु आहे़ शिवशाहीमधून आरामदायी प्रवास करण्यासाठी अन्य बसच्या तुलनेत प्रवाश्यांना लवकर पोहचविता यावे, याकरीता विनावाहक सेवा सुरु करण्यात आली होती़१ आॅक्टोबरपासून अंमलधुळ्याहून जळगाव जाण्यासाठी अगदी तास-दीड तासाने बस धावत आहेत़ यात आता शिवशाही बसची सेवा जोडण्यात येत आहे़ म्हणजे शिवशाही बसमधून आरामदायी प्रवासाची सेवा येत्या १ आॅक्टोबरपासून जळगाव विभागाकडून सुरु करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक यांनी सांगितले़ यामध्ये दिवसभरातून जळगावहून तीन आणि धुळे विभागाकडून तीन शिवशाही बस सोडण्यात येणार आहेत़ सामान्य प्रवाशांना फायदासर्वसामान्य नागरिक इच्छा असून देखील या बसमधून प्रवास करु शकत नव्हते़ या बसला कुठेही थांबा नसल्याने पारोळा आणि एरंडोल पर्यंतच्या नागरीकांना साध्या बसमधून प्रवास करावा लागत होता़ आता जळगाव ते धुळे आणि धुळे ते जळगाव या मार्गावरील पारोळा आणि एरंडोल या ठिकाणी ही बस थांबणार आहे़ परिणामी या थांब्यावरील प्रवाश्यांची सोय होणार आहे़ अधिकचे असणार भाडेशिवशाही बसमधून प्रवास करणाºया नागरीकांना साध्या बसपेक्षा अधिकचे भाडे मोजावे लागणार आहे़ त्यामुळे सुध्दा काही प्रवाश्यांची नाराजी असणे स्वाभाविक आहे़ साध्या बसप्रमाणे या बसमधून प्रवास करणाºया प्रवाश्यांकडून भाडे आकारणी केल्यास अधिक सुलभ होऊ शकेल असे प्रवाश्यांना वाटते़ प्रवाशांअभावी खोळंबागेल्या काही दिवसांपासून जळगाव ते धुळे या मार्गावर शिवशाही बससेवा सुरु होती़ पण, नियमित भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी होत असल्यामुळे प्रवाशांंकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता़ परिणामी या मार्गावरील सेवा काही काळासाठी ठप्प होती़ आता दोन थांबे दिल्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे़ दोन थांबे अन् वाहक सुध्दाजळगाव ते धुळे मार्गावर यापुर्वी सुरु केलेली बससेवा ही विनावाहक होती़ यामुळे ही बस जळगावहून सुटल्यास न थांबता थेट धुळे येत होती़ परिणामी यात जळगावहुन जितके प्रवासी बसलेले असतील तेवढेच प्रवासी घेऊन बस धुळे धावत होती़ या सेवेला मिळणाºया अल्प प्रतिसादामुळे शिवशाहीची विनावाहक सेवा बंद करावी लागली होती़ यात पुन्हा सेवा सुरु केली जात असून यामध्ये वाहक असणार आहे़ यासोबतच एरंडोल आणि पारोळा हे दोन थांबे देण्यात आले असून येथून प्रवासी घेऊन जाईल़ यामुळे आता या सेवेला किती प्रतिसाद मिळतो, हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे