पाणीपट्टी सरसकट करण्याची शिवसेनेची शिरपूर येथील प्रशासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 22:46 IST2021-02-09T22:45:44+5:302021-02-09T22:46:05+5:30
नगरपालिका प्रशासनाला दिले निवेदन

पाणीपट्टी सरसकट करण्याची शिवसेनेची शिरपूर येथील प्रशासनाकडे मागणी
शिरपूर : पूर्वी शिरपूरवासियांना दिवसातून दोन वेळा वरवाडे नगरपरिषदकडून पाणीपुरवठा होत होता, त्यात देखील नागरिकांना मात्र वर्षभर फक्त पंधराशे रुपये पाणीपट्टी होती़ चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे़ त्यामुळे पाणीपट्टी सरसकट करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे़
शिवसेनेतर्फे नगरपालिका प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांना या संदर्भातले निवेदन देण्यात आले़ नगरपरिषदेने चोवीस तास पाणी ही योजना राबविल्यानंतर स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे़ सर्वसामान्यांना न परवडणारी पाणीपट्टी प्रत्येकासाठी डोकेदुखी झाली आहे़ स्थानिक स्वराज्य संस्था येथे एक हाती सत्ता असल्याने प्रत्येक ठराव एकमताने मंजूर करण्यात येतात़ यात नागरिकांचा हिताचा विचार न करता मनमानी कारभार केला जातो़ चोवीस तास पाणी उपलब्ध नसतांना सुद्धा नागरिकांना दहा ते पंधरा हजार पर्यंत पाणीपट्टी दिली जात आहे़
दुसरीकडे संबंधित पाणीपट्टी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे़ पाणीपट्टी बिल संदर्भात प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यावर ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात येते़ दोन दिवसात पाणीपट्टी भरावी लागेल अन्यथा नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल अशी वागणूक दिली जात आहे़