Separate fuel bill details | इंधन बिलाचे स्वतंत्र विवरण द्यावे
इंधन बिलाचे स्वतंत्र विवरण द्यावे

आॅनलाइन लोकमत
धुळे :सातव्या वेतन आयोगातील वेतनात त्रुटी आहेत. तसेच शाळांना इंधन बिलाचे स्वतंत्र विवरण देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे धुळे गटविकास अधिकारी घोरपडे व गटशिक्षणाधिकारी पी.टी.शिंदे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदना तालुकास्तरावरून जी. पी.एफ. स्लिप मिळावी, डीसीपीएसधारकांना दरवर्षी हिशोब मिळावा, जी.आय.एस.एल.मधील गृहकर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी, सातव्या वेतन आयोगातील संपूर्ण फरकाचे स्टेटमेंट मिळावे, मे महिन्याचे इंधनबील मानधन मिळावे, ३५४ रूपये अपघात विम्याची नोंद सर्व्हिस पुस्तकात घ्यावी, शाळास्तरावर येणारे अनुदान हे कोणते अनुदान आहे ते स्पष्टपणे नोंदवण्यात यावे यासाठी बँकांना पत्र द्यावे, दरमहा पगाराचे विवरण पत्र मिळावे यासह विविध मागण्यांचा यात समावेश होता. दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून सर्व प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत महाले, रूषिकेश कापडे, तालुकाध्यक्ष दिलीप वाडेकर, खुशाल चित्ते, कैलास सोनवणे, रमाकांत भामरे, हंसराज वाघ आदी उपस्थित होते.

Web Title: Separate fuel bill details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.