शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांनंतरही आत्मविश्वास दांडगा; २९६ वृद्धांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

धुळे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण रुग्णांचा मृत्यू झाला असताना जिल्ह्यातील २९६ वृद्धांनी मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे. ...

धुळे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण रुग्णांचा मृत्यू झाला असताना जिल्ह्यातील २९६ वृद्धांनी मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, या लाटेने अनेक तरुणांना मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त होते. तसेच त्यांचे अधिक मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत मात्र कमी वयाच्या रुग्णांचे अधिक मृत्यू झाले आहेत. वृद्धांमधील संसर्गाचे प्रमाण मात्र घसरले होते. ८० पेक्षा अधिक वय असलेल्या २९६ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. मेहनतीची सवय व आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनावर विजय मिळवला असल्याची प्रतिक्रिया वृद्ध रुग्णांनी व्यक्त केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीकरण झाल्यामुळे वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असावे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. एचआरसीटी स्कोअर जास्त असतानाही अनेक वृद्धांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

५० ते ६० वयोगटातील अधिक मृत्यू

१ - कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक होते.

२ - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना संसर्ग होण्याचे व मृत्यूचे प्रमाणही जास्त होते.

३ - कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचे अधिक मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत मात्र कमी वयाच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले.

४ - मंगळवारी देखील धुळे शहरातील ५१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

आम्हाला कोणीच हरवू शकत नाही !

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली; पण तरीही दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली. फुप्फुसांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. एचआरसीटी २० इतका आला होता. शहरातील खासगी रुग्णालयात २५ दिवस उपचार घेतले व बरा झालो. सकारात्मकता ठेवल्याने बारा होऊ शकलो.

- उत्तमचंद रतिलाल शेठ

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू होता. नेमके त्याचवेळी माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शहरातील खासगी रुग्णालयात एकही बेड उपलब्ध होत नव्हता तसेच शासकीय रुग्णालयही फुल्ल झाले होते. त्यामुळे सकारात्मक विचार केला व डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करून बरा झालो.

- रमेश रूपचंद भट्टड

८० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - ३१८

बरे झालेल्या रुग्णांची संख्या - २९६

पहिली लाट -

पॉझिटिव्ह - १८२

मृत्यू - १४

दुसरी लाट

पॉझिटिव्ह - १३६

मृत्यू - ८