वाळू माफियांची तलाठ्याला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 06:55 IST2024-02-07T06:55:16+5:302024-02-07T06:55:28+5:30

पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Sand mafia hit Talatha | वाळू माफियांची तलाठ्याला धक्काबुक्की

वाळू माफियांची तलाठ्याला धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वाळूची अवैध वाहतूूक करताना पकडल्याचा राग आल्याने शिरपूर येथील तलाठ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

तलाठी सुरेश तुकाराम ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी सहकारी अनिरुद्ध बेहरे यांच्यासह नवे लोंढरे गावात ते गेले होते. तेव्हा अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविल्यावर ट्रॅक्टरमालकासह चालकाने तलाठी ठाकरे यांची कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी दिली. 

Web Title: Sand mafia hit Talatha