शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
5
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
6
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
7
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
9
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
10
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
11
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
12
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
13
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
14
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
15
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
16
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
17
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
18
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
19
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
20
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची भूमिका माझ्यासाठी गौरवास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:53 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर एका धर्माचे किंवा एका जातीचे मुळीच नव्हते़ त्यांचे कार्य ...

ठळक मुद्देसुभाषचंद्र बोस यांची भूमिका मला आवडेलडॉ़ आंबेडकरांची भूमिका करण्याचं धाडस कसे मिळाले?सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अथांग अनुभव

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कमहामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर एका धर्माचे किंवा एका जातीचे मुळीच नव्हते़ त्यांचे कार्य सर्वव्यापी असतांनाही आजच्या समाज व्यवस्थेने महापुरूषांना वाटून घेतले आहे़ बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज तसेच त्यांनी दिलेली शिकवण सर्वांपुढे यावा, त्यांचा आदर्श घेऊन चांगला माणूस घडावा या उद्ेशाने या मालिकतून प्रयत्न केला आहे़ असे मत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेता सागर देशमुख यांनी लोकमत शी बोलतांना सांगितले़प्रश्न : डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका करतांना काय अनुभव मिळाला?देशमुख : सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अथांग अनुभव होता़ अशा महामानवासोबत माझी तुलना कधीच होऊ शकत नाही़ त्यांची भूमिका साकारण्यासाठी अनेक पुस्तकांचे वाचन केले़ तरीही अभिनय करतांना माझ्या मनात खुप भिती असायची़प्रश्न : पु़ ल़ देशपांडे व डॉ़ बाबासाहेंब आंबेडकर यांची तुम्ही भूमिका साकारली, त्याविषयी काय सांगाल ?देशमुख : पु़ ल़ देशपांडे म्हणजे सर्वांना जवळ घेणारे साहित्यिक होते़ तर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा दबदबा असल्याने कोणी सहसा जवळ येत नव्हते़ एक साहित्यिक तर दुसरे विविध कार्यात व्यक्तीची भूमिका साकारतांना कधी नम्रता तर कधी कठोरता अशी भूमिका मला मालिकेच्या अभिनयात घ्यावी लागली़डॉ़ आंबेडकरांची भूमिका करण्याचं धाडस कसे मिळाले?देशमुख : पुण्यात वकीलीचे शिक्षण घेत असतांना प्रख्यात कायदेतज्ज्ञ डॉ़ बाबासाहेंब यांच्या वकीली क्षेत्रातील प्रदिर्घ अभ्यास अनुभवला होता़ ज्यावेळी मला त्यांचीच भूमिका करण्यासाठी फोन आला़ त्यावेळी मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला़ त्यानंतर मात्र, माझ्याकडून खरोखर एवढ्या महान व्यक्तीचे अभिनय होईल का? या भितीने मला रात्रभर झोप लागली नव्हती़वडीलांची शिक्षणाचे महत्व पटवून दिले़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वडील सुभेदार रामजी यांनी लहान पणापासून आयुष्यातील कठीण गोष्टींना तोंड देत, प्रसंगी पोटाला चिमटे काढून, काटकसर करुन चांगला माणूस म्हणून शिकवलं, चांगली व्यक्ती म्हणून घडवलं, त्यांनीच शिक्षण त्यांची अंगी जोपासले़ आणि अशाच रामजी बाबांचं मालिकेत देहावसानाचा दाखवलेला प्रसंग भावनिक वळण देणारा ठरला़सुभाषचंद्र बोस यांची भूमिका मला आवडेलसाहित्य पू़ल देशपाडे, त्यांनतर महामानव डॉ़ आंबेडकर यांच्या भूमिका करण्याची मला संधी मिळाली़ ही बाब माझ्यासाठी गौरवास्पद आहे़ या मालिकेनंतर जर मला भविष्यात सुभाषचंद्र बोस यांनी भूमिका करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेल असेही मराठी अभिनेता सागर देशमुख यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे