शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील गटांच्या फेररचनेमुळे अनेकांची संधी हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:53 IST

राज्यातील सत्तेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर हालचाली वाढतील

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी यावर्षी गटांची थोडेफार फेररचना करण्यात आलेली आहे. या फेररचनेचा अनेकांना फटका बसू शकतो. तर गेल्यावेळी पदावर असलेल्या काही पदाधिकाऱ्यांचे गट आरक्षित झालेले असल्याने, त्यांनाही दुसºया गटाचा शोध घ्यावा लागणार आहे.जिल्ह्यात ५६ गट आहे. त्यापैकी १५ गट सर्वसाधारण, २३ गट अनुसूचित जमाती, १५ गट नागरिकांचा मागासप्रवर्ग व ३ गट अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत.धुळे तालुक्यात पूर्वी १७ गट होते. मात्र तालुक्यातील काही गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने, वरखेडे, मोराणे प्र.ल., वलवाडी, बाळापूर हे पूर्वीच चार गट बाद झाले आहेत. मात्र मुकटी व बोरविहिर हे नवीन गट तयार करण्यात आलेले आहे. तालुक्यातील गटांची संख्या १५ वर आलेली आहे.शिरपूर तालुक्यात पूर्वी १३ गट होते. आता या तालुक्यातील गटांची संख्या १४ झालेली आहे. या तालुक्यात ंिशंगावे, विखरण बु्रदुक, हे नवीन गट तयार करण्यात आलेले आहेत. तर बभळाज ऐवजी हिसाळे तर थाळनेर गटाचे विभाजन करून मांजरोद गट तयार करण्यात आलेला आहे.शिंदखेडा तालुक्यात पूर्वी ९ गट होते, आता त्यांची संख्या १० झालेली आहे. या तालुक्यात वर्षी हा नवीन गट अस्तित्वात आलेला आहे. या गटात बाम्हणे ऐवजी धमाणे हा गट झालेला आहे.साक्रीत चार गटांचे विभाजनसाक्री तालुक्यात १७ एवढी गटसंख्या कायम आहे. मात्र काही गटांची फेररचना झालेली आहे. जैताणे गटाचे विभाजन करून दुसाणे गट तयार केला. दहिवेल गटाचे विभाजन करून बुरूडखे, तर पिंपळनेर गटाचे विभाजन करून सुकापूर, कासारे गटाचे विभाजन करून शेलबारी व साक्री गटाचे विभाजन करून भाडणे हे गट तयार केले आहेत.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गटांचे विभाजन झाल्याने, तसेच काही गट राखीव झाल्याने, जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांची कोंडी झालेली आहे. या इच्छुकांनाही आता नवीन गटांचा शोध घ्यावा लागणार आहे. तर काही काहींची इच्छा असूनही गटांच्या विभाजनामुळे संधी हुकण्याची शक्यता आहे. आता कोणाला कोणत्या गटातून प्रतिनिधीत्व करता येवू शकेल हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे. ार्यंत कोणता पक्ष नेमका कोणासोबत आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Dhuleधुळे