शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नियमित १७५ टन कचयाचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:54 AM

महापालिका : तीन वर्षांसाठी दिला ठेका, शहरात फिरताय ११९ घंटागाड्या

धुळे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचरा संकलनासाठी घंटागाडी महापालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे़ सध्याच्या स्थितीत ११९ लहान मोठ्या वाहनांच्या माध्यमातून सुमारे १५० ते १७५ टन कचºयाचे संकलन केले जात आहे़ त्यामुळे कचºयाची समस्या बºयापैकी संपुष्टात येण्यास मदत मिळत असल्याचे समोर येत आहे़ शहराचा विस्तार वाढत असताना त्यात पुन्हा आता नव्याने काही गावांचा समावेश झाला आहे़ परिणामी कचºयाची विल्हेवाट लावणे हा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आला होता़ स्वच्छतेच्या कामात महापौरांनी घेतला पुढाकारविद्यमान महापौर चंद्रकांत सोनार यांनी आपल्या पदाचा पदभार  स्विकारल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छतेच्या कामात लक्ष केंद्रीत करण्याचे सुतोवाच दिले होते़ त्यानुसार, त्यांनी महापालिकेची संपुर्ण यंत्रणा याकामी लावली होती़ परिणामी स्वच्छतेच्या कामांकडे अधिक लक्ष दिले जाण्यास सुरुवात झाली होती़ वेळोवेळी घेतल्या बैठका आणि केले नियोजनमहापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रशासनाची मदत घेऊन कचरा संकलनासाठी काय करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यासाठी अधिकाधिक कचरा गोळा व्हावा म्हणून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या़ त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात येऊन कचरा संकलनाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ ११९ घंटागाड्यातूनकचºयाचे होतेय संकलनशहरातील काना कोपºयातून जास्तीत जास्त कचºयाचे संकलन व्हावे यासाठी महापालिकेने सुमारे १७ कोटींचा ३ वर्षासाठींचा ठेका एका कंपनीला दिलेला आहे़ कचरा संकलनासाठी सद्यस्थितीत ७९ घंटागाडी, १० टेम्पो आणि ३० ट्रॅक्टरच्या माध्यमातून दररोज किमान १५० ते १७५ टन कचरा संकलित होत आहे़ एक टन कचरा संकलित झाल्यास ३१८ रुपये दिले जात आहेत़कचरा संकलनात हवे नागरीकांचे योगदानमहापालिका प्रशासनामार्फत नागरीकांच्या सोयीसाठी घंटागाड्या सुरु करण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे नागरीकांनी आपल्या घरात जमा होणारा ओला आणि सुका कचरा इतरत्र न फेकता तो संकलित करुन घंटागाडी आल्यानंतर त्यात टाकणे अपेक्षित आहे़ कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी हवे प्रयत्नदररोज जमा होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट हा देखील मोठा प्रश्न आहे़ तरी देखील त्यावर तोडगा काढत प्रशासनाकडून कचरा संकलित केला जात आहे़ सध्या वरखेडी डेपोच्या ठिकाणी जमा होणारा कचरा संकलित केला जात आहे़ त्याच्याच बाजूला आता नव्याने जमा होणारा कचरा संकलित होतोय़ नियमित घंटागाडी येणे गरजेचे, अपेक्षा वाढलीशहरातील बहुसंख्य ठिकाणी नियमित घंटागाडी जात असलीतरी काही ठिकाणी घंटागाडी जाण्याचे सातत्य नसल्याची ओरड होत आहे़ त्यामुळे एक ते दोन दिवसाआड नियमित घंटागाडी येणे गरजेचे आहे़ 

तत्कालिन आयुक्तांचा होता पुढाकारमहापालिकेचे तत्कालिन आयुक्त नामदेव भोसले यांनी देखील शहरातील स्वच्छतेकडे आणि पांझरा नदीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते़ त्यांच्या कार्यकाळात दररोज सकाळी महापालिकेच्या कर्मचाºयांची टीम शहरातील विविध भागात जावून तेथील नागरीकांच्या मदतीने स्वच्छतेच्या कामांकडे लक्ष देत होते़ या माध्यमातून सुध्दा दररोज कितीतरी टन कचरा गोळा होत होता़ आजही ही आठवण ताजीच आहे़ स्वच्छतेचा वसा आता घेतला गेला असून घंटागाड्यांच्या माध्यमातून याकडे लक्ष दिले जात आहे़ त्यात सातत्य टिकविण्याची गरज आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे