हिसाळे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द, पुरवठा विभाग : पावणे तीन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:08+5:302021-04-06T04:35:08+5:30

त्या अनुषंगाने ४ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गावी जाऊन तपासणी केली. सर्व लाभार्थ्यांचे जाब-जबाब घेतले. त्यामध्ये ...

Ration shop license revoked at Hisale, supply department: Rs 3 lakh fine | हिसाळे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द, पुरवठा विभाग : पावणे तीन लाखांचा दंड

हिसाळे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द, पुरवठा विभाग : पावणे तीन लाखांचा दंड

त्या अनुषंगाने ४ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गावी जाऊन तपासणी केली. सर्व लाभार्थ्यांचे जाब-जबाब घेतले. त्यामध्ये ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. स्वस्त धान्य दुकानदार यांनी लाभार्थ्यांना कमी दिलेले धान्य व जास्त वसूल केलेले पैसे वसूल का करण्यात येऊ नये? याबाबत दुकानदारास नोटीस देऊन खुलासा मागितला असता, ते समाधानकारक खुलासा देऊ शकले नाही म्हणून दुकानदार यांच्याकडून २ लाख ७६ हजार ४८५ इतकी रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत. तसेच संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे.

संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांचा परवाना तक्रारीवरून यापूर्वीही दोन ते तीन वेळा रद्द करण्यात आलेला आहे. तरीही त्यांच्या वर्तणुकीत फरक न पडल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Ration shop license revoked at Hisale, supply department: Rs 3 lakh fine