शिंदखेडा तालुका शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्यावतीने सालाबादाप्रमाणे एक दिवस आधीच रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात येतो. शिवसैनिकांना रक्षाबंधननिमित्त शिवबंधन बांधणे तसेच सातत्याने जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांनादेखील रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात येते. या वर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात आला. युवती सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख शिवानी दीपक पवार, महिला आघाडीच्या तालुका उपसंघटक अलका अरविंद कापुरे व युवती सेना शहर प्रमुख रवीना परदेशी, चारुशीला नरेंद्र साळुंखे, रुबीना मुनीर पिंजारी, वंदना पवार, गणेश परदेशी, विनायक पवार, प्रदीप पवार, विशाल ठाकरे, दीपक पवार, दिनेश साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेना महिला आघाडीतर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनला रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST