शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीत शेतकरी पाण्यासाठी अनुत्सूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:02 IST

लाटीपाडा धरण : १५ शेतकऱ्यांनी भरले पाणी अर्ज; हंगाम काहीअंशी लांबला

पिंपळनेर : रब्बी हंगाम यंदा एक महिना उशिरा होऊनही लाटीपाडा धरणातून शेतकरी पाणी मागत नसल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अर्ज भरणे सुरू केले असून देखील हे अर्ज भरण्यासाठी शेतकरी उत्सुक नसून आतापर्यंत १५ शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे.गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी लाटीपाडा धरणातून पाटाद्वारे शेतकºयांना तसेच डाव्या व उजव्या कालव्यावरील शेती करणाºया शेतकºयांना लाटीपाडा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. यंदा एक महिना उशिर होऊनही रब्बी हंगामासाठी अद्याप शेतकºयांनी सुरुवात केलेली नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी अद्याप शेतकºयांनी केलेली नाही. रब्बी हंगामाची सुरुवात ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होत असल्याने शेतकरी मशागती करण्यास तसेच पिकांची पेरणी करण्यास सुरवात करीत असतात. तसेच डाव्या व उजव्या कालव्यावर अंदाजे एक हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र हे लाटीपाडा धरणावर अवलंबून असते.पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी रब्बी हंगामासाठी धरणात असलेल्या शिल्लक पाण्याचे नियोजन रब्बीसाठी करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प हे पाण्याने भरलेले आहेत. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. असे असून देखील रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत येणारे शेतकरी हे पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच फळबागायतदार व माखळे या शिवारात शेतकºयांनी पेरणीची कामे सुरू केलेली नाहीत.डिसेंबर अर्धा संपला तरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी शेतकºयांनी केली नाही.गेल्या काही दिवसांपासून बंधारे विभागात पाणी मागणे अर्ज भरणे सुरू केले असून देखील याला शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. लाटीपाडा धरण, जामखेली, विरखेल व शेलबरी एमआयटॅन्क आदी धरणांवर अवलंबून असणाºया शेतकºयांनी पाण्याची मागणी केली नाही. तसेच पाणी मागणी अर्ज भरणे सुरू असून अर्ज कोणी भरण्यासाठी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकल्प हे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.रब्बी हंगाम काहीअंशी लांबला आहे. तसेच डिसेंबर महिना सुरू होऊनही यंदा थंडीचे प्रमाण हे कमी आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांच्या चिंता या वाढलेल्या आहेत.दरम्यान पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात येणाºया पाटचाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगले आहे. तसेच गाळ साचलेला आहे. जेसीबीच्या साह्याने हा गाळ काढण्यात यावा, तन देखील काढण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे