धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:35 IST2019-11-27T13:35:26+5:302019-11-27T13:35:42+5:30
सीईओंच्या दालनात झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर झाली सकारात्मक चर्चा

धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावा
आॅनलाइन लोकमत
धुळे : अनुकंपा तत्वावरील भरती दरवर्षी करण्यात यावी, पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.सिस्टीम बसवावे यासह जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून, त्या तत्काळ मार्गी लावाव्यात अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली. दरम्यान समस्या लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन सीईओंनी दिले.
जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत संघटनेची बैठक सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या दालनात झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कर्मचाºयांनी सीईओंसमोर काही मागण्या मांडल्या. त्यात कर्मचाºयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषद इमारतीत मध्यवर्ती ठिकाणी आर.ओ.सिस्टीम बसवावी, सातव्या वेतन आयोगानुसार १०,२०,३० वर्षाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजनाचा लाभ लागू करावा, याबाबतच्या परिपूर्ण नस्त्या तयार करून ठेवाव्यात, वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे पदे भरतांना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर संभाव्य रिक्त पदांवर पदोन्नती करण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन दुरूस्ती करावी, २००८साली झालेल्या दंगलग्रस्तांना मदत करण्यासाठी कर्मचाºयांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले होते. हा १० लाखाचा निधी कल्याण भवनाच्या दुरूस्तीसाठी वर्ग करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हा कर्मचारी निवासस्थान दुरूस्ती करण्याबाबतची अनुदानाची नस्ती मंजूर झाली असून लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
कर्मचाºयांच्या विविध अडचणींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश महाले, सचिव दीपक महाले, कार्याध्यक्ष किशोर पगारे, अनिल बेडसे, पोपटराव सूर्यवंशी, रंजना साळुंखे, रवींद्र देवरे, संतोष बागले, वनराज पाटील, ज्योती पाटील, प्रमिला मदने, दुर्गेश बोरसे, नंदकुमार चौधरी उपस्थित होेते.