राजस्थान येथे जाणाऱ्या चौदा नागरिकांचे केले क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:12 IST2020-03-30T22:12:01+5:302020-03-30T22:12:52+5:30
पिंपळनेर : शहरातील मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था

dhulle
पिंपळनेर : मिरज सांगली येथून राजस्थानला पायी जाणाºया ४४ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना चौदा दिवसासाठी क्वारंटाईन केले आहेत़ तर येथील वाणी मंगल कार्यालयात त्यांनी राहण्याची व्यवस्था केली आहे़
कोरोना या संसर्गजन्य विषाणू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केद्र व राज्य सरकारने २१ दिवस लॉकडाऊन केले आहे़ तर राज्य सरकारने देखील जिल्हा बंदी आदेश दिले आहे़ मात्र मंजूरांच्या हाताला काम नसल्याने मंजूरांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे मंजूरांनी पायी आपल्यागावाकडे निघाले आहे़ स्थलांतरी करणाºया नागरिकांना शहरात थांबून त्यांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाने स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे़
सोमवारी मिरज सांगली येथून राजस्थानकडे पायी जाणाºया ४४ नागरिकांनी राजस्थानकडे जाणारी ट्रक क्र.आर जे १९-जी. सी.९१४७ ट्रकचा चालक सुरेश बिजलखान यांना राजस्थानला घेऊन जाण्याची विनंती केली़ ट्रक चालकाने सर्व नागरिकांना ट्रकमध्ये बसून मागून फळ्या लावून बसवुन घेवून जात होतो़ शेलबारी येथील चेक पोस्ट येथे वाहनाची तपासणी करीत असतांना ट्रकमध्ये ४४ नागरिक आढळून आले़ या सर्व नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जमादार आऱ बी. केदार, खैरनार, पो.कॉ. प्रावीण अमृतकर, भूषण वाघ, नाईक माळी, हे. कॉ. सुर्वे यांनी ताब्यात घेत या संदर्भातची माहिती अप्पर तहसीलदार विनायक थविल दिली़ या सर्व नागरिकांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करून सर्वांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे.
क्वारंटाईन करण्यात आलेल्या ४४ नागरिकांना येथील लाडशाखिय वाणी मंगल कार्यालयात अप्पर तहसीलदार थविल यांनी राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली आहे़ प्रशासनाला सहकार्य करावे, आपल्या घरी फोन लावून या संदर्भात माहिती द्यावी़ अशा सुचना पोलिसांकडून त्या नागरिकांना देण्यात आल्या़ दरम्यान याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.