शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
5
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
6
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
7
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
9
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
10
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
11
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
12
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
13
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
14
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
15
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
16
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
17
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
18
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
19
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
20
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

सैय्यदनगरला यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:00 IST

तगतरावाची उत्साहात मिरवणूक : दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील सैय्यदनगर येथे ग्रामदैवत मरीमाता यात्रोत्सवाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्याने तगतरावची मिरवणूक काढण्यात आली. सैय्यदनगर येथे गुरुवार ३० रोजी ग्रामदैवत मरीमाता मंदिराला श्रीफळ वाहून व प्रदिक्षणा घालून यात्रेला सुरुवात झाली.यात्रा उत्सवानिमित्ताने भाविकांनी नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी चार वाजता गावातून तगतरावची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सावट असतानाही यात्रोत्सवात उत्साह दिसून आला. या यात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे घरोघरी बोकडाची मान मानले जाते. प्रत्येक नातेवाईकास या यात्रेस बोलविले जाते आणि नवस फेडण्यात येतो. यात्रा परिसरात संसारोपयोगी साहित्य, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, ज्वेलरी, कटलरी यासह मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. रोजगारानिमित्त बाहेरगावी असणारे सैय्यदनगर येथील रहिवासी ग्रामदैवत मरीमातेच्या यात्रोत्सवासाठी गावी परतल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी शालीग्राम शांताराम रोहिणी भोईटीकर यांचा लोकनाट्य आयोजित करण्यात आले होते.

टॅग्स :Dhuleधुळे