शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दिरंगाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

धुळे : परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष, दिरंगाई होण्याची शक्यता असून, एखाद्या रुग्णाचे बरेवाईट झाल्यास परिचर्या वर्गाला जबाबदार ...

धुळे : परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष, दिरंगाई होण्याची शक्यता असून, एखाद्या रुग्णाचे बरेवाईट झाल्यास परिचर्या वर्गाला जबाबदार धरु नये, असा गंभीर इशारा हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचारिकांनी दिला आहे. दरम्यान, १५० अधिपरिचारिका उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी हिरे महाविद्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे पुरेसे बेड आणि पुरेसे मनुष्यबळ असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे सिध्द झाले आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे कोरोना नोडल अधिकारी डाॅ. दीपक शेजवळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात १५० अधिपरिचारिकांची कोविड कक्षासाठी त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना उत्तम रुग्णसेवा देणे सोयीचे होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.

तत्पूर्वी, ३० मार्चला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिसेविका यांना निवेदन दिले होते. त्यानंतर अधिसेविका कार्यालयाने सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देऊन हा गंभीर प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

अधिसेविकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या कोविड आणि नाॅन कोविड विभागात प्रत्येकी दोन अधिपरिचारिका व इतर कोविड आयसीयुमध्ये २ असे प्रत्येक कक्षात ११ अधिपरिचारिका वर्ग नियुक्त आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या पाहता जास्तीच्या परिचर्या वर्गाची कोविड व नाॅन कोविड या कक्षात आवश्यकता आहे. परिचर्या वर्गाच्या तीन शिप्टमध्ये ड्युटी लावल्या आहेत. बरेच कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह येतात. त्यांचे कुटुंबदेखील पाॅझिटिव्ह येत असल्याने आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता व त्यात वैद्यकीय रजा देणेदेखील अनिवार्य झाले आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छा असूनही रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्यास अथवा रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवल्यास अधिसेविका या नात्याने जबाबदार धरु नये, असा इशारा अधिसेविका अरुणा भराडे यांनी दिला आहे. तसेच इतर संस्थांमधून उसनवारीने किंवा कंत्राटी तत्त्वावर १५० अधिपरिचारिकांची भरती करावी, अशी मागणी आहे.