शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी डाळींब बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:48 IST

मालपूर परिसर : उन्हाने गाठला उच्चांक, उद्ध्वस्त झालेल्या बागेमुळे शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील डाळींबाची बाग पाण्याअभावी करपून गेली आहे. यावर्षी उन्हाने उच्चांक गाठल्याने उष्णतेमुळे बाग पुन्हा बहरेल, याची शक्यताही उरलेली नाही. दुष्काळाच्या झळांची तीव्रता मालपूरसह परिसरात दिवसेंदिवस वाढत असून हा दुष्काळ चारा, पाण्यापुरता मर्यादित राहिला नसून जीवापाड जपलेल्या शेत शिवारातील बागा देखील उद्ध्वस्त करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.दोंडाईचा-मालपूर रस्त्याच्या आजुबाजूला मालपूर शिवारातील डाळींब बाग, आवळा बाग व सिताफळ बाग पाण्याअभावी नुसत्या करपल्याच नाहीत तर सुकून गेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न मालपूरसह परिसरातील गावांमध्ये गंभीर झाला आहे. याचा फटका आता दिर्घमुदतीच्या फळबागा पिकांपर्यंत येऊन पोहाचल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानावनात जनावरांचा चारा संपुष्टात आल्याने शेतकरी आधीच हैराण झाले आहे. त्यात वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवून देणाºया फळबागा देखील डोळ्यादेखत उन्हामुळे खाक झाल्यामुळे आता शेती करायची उमेदच शिल्लक राहिली नसल्याची प्रतिक्रीया शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.यावर्षी तुलनेने कमी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यातील दोन दिवसाचा पाऊस सोडला तर त्यानंतर पाण्याचा थेंबही पडला नाही. गेलेला पाऊस पोळ्याला हमखास येतो, असे  अनुभवी शेतकरी सांगतात. मात्र, यंदा ही अपेक्षाही फोल ठरल्यामुळे विहिरींना पाणीच आले नाही. ओहोळ, लहान मोठे जलयुक्त बंधारे दोन वर्षांपासून कोरडे आहेत. तसेच अमरावती मध्यम प्रकल्पात १४ वर्षांपासून ठणठणाट आहे.शेतकºयांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी शेकडो हेक्टरवर डाळींब, सिताफळ, आवळा बागांची लागवड करुन जोपासना केली होती. मात्र, यावर्षीच्या दुष्काळात या बाग वाळून गेल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांनी अगोदर टँकरद्वारे पाणी देऊन या बागा जगविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, टँकर भरुन आणणे देखील आता शक्य नसल्याने नाईलाजस्तव सोडून द्यावे लागत आहे. डाळींबास कळी लागली. मात्र, डाळींब तयार होण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने फळांसह बागा सुकून गेल्या, असे शेतकयांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhuleधुळे