पोलीस भरतीत अनियमितता कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:33 IST2018-03-27T23:33:06+5:302018-03-27T23:33:06+5:30
धुळे : पोलीस दलात खळबळ

पोलीस भरतीत अनियमितता कर्मचारी निलंबित
ठळक मुद्देपोलीस कर्मचारी निलंबितपोलीस अधीक्षक यांची कारवाईपोलीस दलात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळ्यातील पोलीस भरती प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने लिपिक संजय ठाकूर याला निलंबित केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
धुळे शहरात गेल्या आठवड्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ त्यात भरतीसाठी लागणाºया साहित्यांची निविदा काढणे गरजेचे होते़ पण, या कामात अनियमितता दाखविल्याने पोलीस कर्मचारी (लिपीक) संजय ठाकूर यांना निलंबित केल्याची माहिती अधीक्षक यांनी दिली़