शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात जेसीबीच्या साह्याने लावली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

शहरातील विद्यानगर व शिवाजीनगर भागात कॉलनीच्या मोकळ्या भूखंडावर ऐन उन्हाळ्यात निंबाची झाडे लावली आहेत. जेसीबी यंत्राच्या साह्याने खड्डे खोदून ...

शहरातील विद्यानगर व शिवाजीनगर भागात कॉलनीच्या मोकळ्या भूखंडावर ऐन उन्हाळ्यात निंबाची झाडे लावली आहेत. जेसीबी यंत्राच्या साह्याने खड्डे खोदून एक फूट बाय एक फूट या अंतरावर झाडे लावण्याचा नवीनच पराक्रम केला आहे. या झाडांना पाणी टाकण्याची कोणतीही सुविधा नाही. लावलेल्या झाडांना संरक्षण जाळी न बसविल्याने आदल्या दिवशी लावलेली झाडे गुरांनी खाऊनही टाकली आहेत. हा प्रयोग बघून कॉलनीतील रहिवासी एकत्र येत त्यांनी साक्री नगरपंचायतीला एक लेखी निवेदन सादर केले असून, ऐन उन्हाळ्यात तेही मार्च महिन्यात झाडे लावण्याचे प्रयोजन काय? या झाडांना पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यांना संरक्षण जाळी लावण्यात आली नाही आणि विशेष म्हणजे साधे फुलझाडसुद्धा एक फूट बाय एक फूट अंतरावर लावले जात नाही तेथे चक्क निंबाची झाडे त्या अंतरावर लावण्यात आली आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटत आहे. हे असले प्रयोग त्वरित थांबवून नगरपंचायतीचे पैसे वाया घालवू नयेत, अशी मागणी कॉलनीतील रहिवाशांनी केली आहे.