शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नृत्याविष्कारातून संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:00 PM

सुळेत ‘भोंगºया’ बाजाराचा जल्लोष  :  बाजार गर्दीने फुलला, लाखो रूपयांची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : आदिवासी बांधवासाठी पर्वणी असलेल्या तालुक्यातील सुळे येथे भोंगºया बाजाराला उत्साहात सुरूवात झाली़ लोकगीत गायन, बासरी  व ढोलच्या आवाजात नृत्य करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दृष्काळाचे सावट जाणवत असले तरी या बाजारात १२-१५ लाखाहून अधिक उलाढाल झाली.  १९ रोजी मंगळवारी सुळे गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता.  याशिवाय मध्यप्रदेशातील रोसर, पलसुद, नागलवाडी, मंडवाडा, चाचरीया व बाबदड येथेही भोंगºया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला़ यानिमित्ताने आदिवासी पाड्यांमधून आलेल्या उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींनी बाजारात चांगलीच धमाल केली. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. तरूणांमधील सळसळता उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडविणाºया येथील भोंगºया बाजारात यंदा परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. भोंगºया बाजारात आपापली दुकाने थाटण्यासाठी निरनिराळ्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरत्या दुकानासाठी जागा उपलब्ध करून घेतल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फावर विविध विके्रत्यांनी दुकाने थाटली होती. भोंगºया बाजाराच्या दिवशी गावातील वातावरण उत्साही दिसून येत होते. सकाळपासूनच  सांगवी गावाजवळील जोयदा, खैरकुटी, पनाखेड, झेडेअंजन, खंबाळे, चौंदी, रोहिणी, खाºया, दोंदवाडी आदी गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. गावाजवळच्या पाड्यांतून येणाºया आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचा ढोल, तीरकामठा, कास्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. दुपारनंतर बाजारात गर्दी उसळली होती. तरूण-तरूणींनी खास आदिवासी पोशाख, काहींनी कमरेभोतवी आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. डोंगरदºयांमध्ये राहणाºया आदिवासींच्या डोक्यावर असलेल्या टोप्यांवर निरनिराळे प्राणी-पक्षांचे चित्र होती. पारंपारिक आदिवासी गितांसह काही हिंदी चित्रपटांच्या गितांचा सुरही आपल्या बासरीतून वाजवित होते. अनेक आदिवासी बांधव गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. बाजारामुळे रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती. भोंगºया बाजार पहाण्यासाठी खास बाहेरगावांहून आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरूणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली़मेलादा उत्सवाच्या तयारीला लागलेत ़़़होळीच्या दुसºया दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी मेलादा म्हणजे मेळावा भरविला जातो. या मेळाव्यात अग्नि विस्तवावर काही लोक अनवाणी चालतात हे पाहण्यासाठी खूपच गर्दी झालेली असते. पावरा लोक अशारितीने आपले सर्वच सण त्यातल्या त्यात होळी हा सण महत्वाचे समजतात. आणि उत्साहाने व पारंपारिक पध्दतीने आजही साजरा करतात. त्यातूनच त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना केली आहे. होळीच्या पाचव्या दिवसापासून फाग गोळा करण्यासाठी पावरा जमातीतील पुरूष फिरतात. एकत्रितरित्या हा कार्यक्रम होतो. भोंगºया उत्सव आता संपण्याच्या मार्गावर असतांना आता मेलादा उत्सवाच्या तयारीला तरूणाई लागलेली दिसते़आज भोंगºया बाजाराचा समारोप ़़़आदिवासी बांधवाचा अप्रतिम असलेला भोंगºया उत्सवाला सुरूवात झाली आहे़ आज २० ला दहिवद, पनाखेड, कोडीद, सिलावद, बालसमुद, घट्या, धनोरा, भवती, सेमलेट, धवळी येथे भोंगºया बाजाराचा समारोप केला जाणार आहे. होळी नंतर येणारा व आदिवासी बांधवाचा सण असलेला मेलादा वा मेवादे म्हणजे विधीवत पूजा करून विस्तवावर चालून साजरा होणारा सणाची सांगता होय. २० ला चोंदी, २१ ला दुरबुड्या, पळासनेर तर २२ ला शेमल्या येथे हा सण पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो.हातात घुंगरू धरून आदिवासी तरुणांनी नृत्याविष्कार सादर करत सर्वांना थक्क करून सोडले. आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थांतर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. होळी उत्सव हा आदिवासी पावरांचा हिंदूच्या दिवाळी सणा इतकाच महत्वाचा असल्यामुळे मोठ्या उत्सवात आनंद घेवून आदिवासी बांधव जल्लोष साजरा करतात़

टॅग्स :Dhuleधुळे