शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांची वैद्यकीय तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:18 IST

मंजुळा गावीत : गावापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : ऊसतोडणी मजूरांना कारखानदार स्त्यावरच सोडून देत असल्याने घरी पायी येत आहेत़ गुजरात राज्यातून येणाऱ्या स्थलांतरीत मजुरांची संख्या आजही कायम आहे़ यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ त्यामुळे राज्यसिमा पुर्णपणे सील करावी़ मजुरांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना आमदार मंजुळा गावीत यांनी प्रशासनाला केल्या़आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत तहसीलदार प्रवीण चव्हाणके, डीवायएसपी श्रीकांत घुमरे, बीडीओ सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़ के़ ढुमने, डॉ. तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात बैठक झाली़गुजरात राज्यातून सध्या ऊसतोडीसाठी गेलेले कामगार परत येत आहेत़ तालुक्यातील मजूर असल्याने ते येतीलच़ आठ ते १० हजार मजूर १००, ५० च्या संख्येने येऊ लागले आहेत़ कारखानदार त्यांना राज्य सिमेपर्यंत सोडत आहेत़ तेथून हे मजूर पायी आपल्या गावाकडे येत असताना गावातील जाणकार मंडळी त्यांना गावात येऊ देत नाही़ अशा ऊसतोड मजुरांना सिमेवर अडवून त्यांची तेथे तपासणी करून त्याच वाहनाने त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करावी़ चेकपोस्टवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना द्याव्यात, पोलीस कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत, तर इतरत्र कुठेही वाहनाला जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, अशांवर कारवाई करावी, भाजीविक्रेत्या वाहनांना परवाना द्यावा, तसेच त्यावर सॅनिटायझर करण्याच्या सूचना द्याव्यात, असंख्य मेंढपाळ मजुरांना गावात येऊ देत नसल्याने त्यांच्या पर्यंत अन्नधान्य पोचवण्याची व्यवस्था करावी, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना सॅनिटायझर, मास्क, पीपीटी किट्स उपलब्ध करून द्यावे, साक्रीत सील केलेल्या तीन किलोमीटर परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, अत्यावश्यक सुविधा याठिकाणी कशा पोचतील याचे नियोजन त्वरित करावे़ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कुणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या़

टॅग्स :Dhuleधुळे