धुळ्यातील मुस्लिम नगरातील घरफोडी महिन्याच्या आत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:03 IST2019-03-02T23:02:19+5:302019-03-02T23:03:43+5:30
चाळीसगाव रोड पोलीस : घरफोडीच्या रकमेतील २ लाख हस्तगत

धुळ्यातील मुस्लिम नगरातील घरफोडी महिन्याच्या आत उघड
धुळे : मुस्लिम नगरात राहणाºया अब्दुल कलाम मोहम्मद इस्लाम अन्सारी यांच्या बंद घरात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली होती़ ही घरफोडी महिन्याच्या आत उघड करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले़
३ लाख २५ हजारापैकी २ लाख वसूलही करण्यात आले़ एकाच्या वाटणीला आलेले १० हजार रुपये रोखही हस्तगत करण्यात आले़ घरफोडीच्या घटनेनंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुन्हा उघडकीस आणला़
यांना झाली अटक
शाहरुख शेख उर्फ बोबड्या अजीज शेख (२८, मारुती मंदिराजवळ आझादनगर), मोसीन अब्दुल रहेमान मलाड (३०, मिल्लत नगर) आणि शेख अरबाज शेख इलियास (१७, आझादनगर) या तिघांना शुक्रवारी रात्री ८ वाजता अटक झाली़