शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची परराज्यात होतेय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 22:36 IST

मालपूर : ९ ते १० हजार रुपये क्विंटलचा भाव, दरात तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील कांदा विक्रीसाठी परराज्यात जात आहे. कांद्याला ९ ते १० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.कांदा कधी शेतकºयाच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. कांद्याच्या भावात यावर्षी चांगलीच तेजी आल्यामुळे शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. यातून अनेक शेतकºयांनी प्रगती साधली आहे. मात्र, परतीच्या पावसाने घात केल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.मालपूरसह परिसरातील अक्कलकोस, हाट्टी, ऐचाळे, शनिमांडळ, वाडी आदी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतातील कांदा सध्या मध्यप्रदेशातील इंदूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. इंदूर येथे कांद्याचे मोठे मार्केट असून ३ डिसेंबर रोजी कांद्याला सरासरी ९ ते १० हजार रुपये क्विंटल दर होता. यात दिवसागणिक वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.किरकोळ बाजारात मध्यम दर्जाचा कांदा ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. हा कांदा आता शंभरी पार करेल. मात्र जोपर्यंत शेतकºयाच्या घरातील कांदा संपत नाही, तोपर्यंत सरकारने कांदा आयात करण्याची घाई करु नये, अशी येथील कांदा उत्पादकांची मागणी आहे. बºयाच वर्षांनंतर कांदा तेजीत विकला जात आहे. शेतकरी हिताचा देखील विचार झाला पाहिजे, अशी प्रतिक्रीया मालपूर येथील शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील उमराण बाजार समितीमध्ये देखील येथील शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन जातात. तेथे उन्हाळी कांद्याला १२ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे सर्वाधिक भाव मिळाल्याचे समजते. सरासरी ८ ते ९ हजार भाव असून लाल कांद्याला सहा हजारापर्यंत भाव आहे.उन्हाळी कांद्याची आवक आता कमी झाली असून शेतकºयांनी चाळीत साठवलेला कांदाही संपत आला आहे. तर नवीन कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने त्याचे उत्पादन घटले आहे. परतीच्या पावसाने घात केला नसता तर यावर्षी बळीराजाला अच्छे दिन पाहायला मिळाले असते. अपेक्षित प्रमाणात नवीन कांदा बाजारात न आल्याने भावात वाढ झाली आहे. मात्र, शेतकºयांचा कांदा संपत नाही तोपर्यंत हा दर टिकून रहावा, अशी मालपूर परिसरातील शेतकºयांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे