शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दरोडा टाकण्यापूर्वीच एकाला पकडले, चौघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 22:29 IST

सुरत बायपासवरील घटना : गस्त घालत असताना घडला प्रकार

धुळे : गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलीस राबवित असलेल्या कोम्बिग ऑपरेशनदरम्यान, सुरत बायपासवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पाच जणांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अंधाराचा फायदा घेऊन चौघे फरार झाले असले तरी पोलीस त्यांच्या मागावर आहेत. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलीस सज्ज झाले असून, शोध मोहीम राबवित आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, एस. पी. तिगोटे, कर्मचारी भिकाजी पाटील, संदीप पाटील हे सुरत बायपासवर गस्त घालत होते. चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ काही तरुण त्यांना संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आले. त्याचवेळेस पोलिसांनी आपले वाहन त्यांच्या दिशेने नेले. त्याचवेळेस चार जणं दोन दुचाकीवरून जाण्यात यशस्वी ठरले. तर, विजय ईश्वर सोनवणे (२८, रा. आरती कॉलनी, नगावबारी चौफुली, देवपूर धुळे) हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत मिरचीची पूड आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यांचा कुठेतरी दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

विजय सोनवणे याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या सोबत असलेल्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांकडून आता त्यांचा शोध सुरू झाला आहे.याप्रकरणी पोलीस कर्चचारी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून विजय सोनवणे याच्यासह पाच जणांविरुध्द भादंवि कलम ३९९, ३४ सह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, फरार असलेल्या चौघांच्या घरावर पोलिसांची नजर आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. तिगोटे करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे