समाजमाध्यमावर मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट, एकावर गुन्हा

By अतुल.रत्नाकर.जोशी | Updated: September 7, 2023 16:27 IST2023-09-07T16:26:42+5:302023-09-07T16:27:39+5:30

संतप्त जमावाने केली संशयिताच्या कारची तोडफोड.

offensive posts on social media against minister girish mahajan one charged | समाजमाध्यमावर मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट, एकावर गुन्हा

समाजमाध्यमावर मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट, एकावर गुन्हा

अतुल जोशी, धुळे: राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करून त्यंची बदनामी केल्याप्रकरणी एकाविरूद्ध धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद म्हणून अज्ञातांनी संशयिताच्या कारची तोडफोड केली.

याप्रकरणी प्रवीण महावीर अग्रवाल (वय ४७, रा. भाईजीनगर,धुळे) यांनी धुळे शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यात म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी मोबाईल बघत असताना  समाजमाध्यमावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे दिसून आले. मंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिसात एका संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारची तोडफोड

दरम्यान या घटनेचे पडसाद उमटले असून, बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारासकाही अज्ञातांनी संशयिताच्या घरासमोर लावलेल्या कारची तोडफोड करून नुकसान केले. कारचे नुकसान केल्यानंतर  अंधाराचा फायदा घेत संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले.   दरम्यान संशयिताच्या पत्नीने आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: offensive posts on social media against minister girish mahajan one charged