शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा दोनशे पार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 11:41 IST

धुळे : जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या म्हणजेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० ...

धुळे : जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या म्हणजेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. मागील दोन महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली होती मात्र आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. धुळे शहरात जास्त रुग्ण आहेत तर साक्री तालुक्यात उपचार घेत असलेले सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण आहेत.जिल्ह्यात मंगळवार अखेर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २३१ इतकी झाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी रुग्णांची संख्या १८४ इतकी होती. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा विस्फोट झाला होता. त्यावेळी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाली होती. मात्र त्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पेक्षा कमी झाली होती. आता त्यात पुन्हा वाढ झाली आहे.६१ टक्के रुग्ण धुळे शहरात-सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६१ टक्के रुग्ण धुळे शहरातील आहेत. धुळे शहरात सुरुवातीपासूनच उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त राहिली आहे. जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या २०४ रूग्णांपैकी १४१ सक्रिय रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. सर्व तालुक्यातील रुग्णांची संख्या मात्र ५० पेक्षा कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. साक्री तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आहेत. धुळे तालुक्यात २७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शिरपूर तालुक्यातील १५, शिंदखेडा ३४ व साक्री तालुक्यातील १४ जण उपचार घेत आहेत. शिरपूर तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली होती. तेथील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ २ इतकी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यात सध्या १५ रुग्ण आहेत.बुधवारी १४ अहवाल पॉझिटिव्हजिल्ह्यातील आणखी १४ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. तसेच एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. धुळे शहरातील कबीरगंज परिसरातील ३५ वर्षीय महिलेचा हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४४ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, तुळशीराम नगर १, सम्राट नगर १, साई समर्थ कॉलनी १, रावेर १, सातपुडा विद्यालय २, गल्ली क्रमांक सात, देवपूर १, खोलगल्ली १ व राम नगर मार्केट यार्ड येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १० अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रॅपिड अँटिजन टेस्टचे सर्व १४ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व १५ अहवाल निगेटिव्ह आले. भाडणे कोविड केंद्रातील ७० अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले . त्यात, कर्मवीर नगर साक्री १ व केवीडी शाळा धनेर येथील एकाचा समावेश आहे. महानगरपालिका कोविड केंद्रातील रॅपिड अँटीजन टेस्ट मधील सर्व १५३ अहवाल निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९ अहवालांपैकी धुळे शहरातील १ अहवाल पॉझिटिव्ह आला. खाजगी प्रयोगशाळेतील १३ अहवालापैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, विद्यावर्धिनी कॉलनी व औदुंबर सोसायटी येथील एकाचा समावेश आहे.