शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातही ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:50 IST

कोरोना रोखण्यासाठी उपाय : गर्दी टाळण्यासाठी एकालाच प्रवेश, उपाययोजनेसाठी एक कोटीपैकी ४० लाखांचा निधी प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदे पाठोपाठ आता जिल्हाधिकारी कार्यालयातही गर्दीला ‘नो एन्ट्री’ आहे़जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचे मुख्य प्रवेशद्वार खुले आहे़ परंतु प्रशासकीय इमारतीच्या दोन्ही बाजुचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत़ शिवाय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करुन केवळ एक व्यक्ती प्रवेश करु शकेल इतके खुले ठेवले आहे़ विशेष म्हणजे या प्रवेद्वारातून गर्दी आता येवू नये यासाठी प्रवेशद्वारावर काठीधारी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे़जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी केली आहे किंवा कसे याबाबत प्रशासनाने कोणतेही लेखी आदेश जारी केलेले नाहीत़ परंतु खबरदारीचा उपा म्हणून गर्दी टाळण्यासाठी प्रवेशद्वार बंद केल्याचे सांगण्यात आले़नेहमीसारखी वर्दळ नाहीचदरम्यान, कोरोनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एक प्रकारे सुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे़ आंदोलने, मोर्चे आणि निवेदन देण्यासाठी जिल्हाभरातील नागरीकांची होणारी गर्दी आता नाही़ विशेष म्हणजे बुधवारी निवेदन देण्यासाठी कुणीही आले नसल्याचे सांगण्यात आले़ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ देखील फारशी दिसली नाही़बैठकांचे प्रमाण वाढलेजिल्हाधिकारी गंगाथरण डी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचाºयांशी सातत्याने बैठक सुरू आहेत़ मंत्रालयातील अधिकारी कोरोनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत़ तासातासाचे अपडेट मागविले जात आहेत़ उपाययोजनांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे़ मंत्रालयाला माहिती पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी देखील सातत्याने तालुका तसेच गाव पातळीवरील यंत्रणेशी सतत संपर्क ठेवून आहेत़दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे धुळे नंदुरबार विधानपरिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलली जाण्याची शक्यता आणि चर्चा होती़ परंतु बुधवारी सायंकाळपर्यंत से कोणतेही आदेश प्राप्त झाले नव्हते़साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणीदरम्यान, जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुधवारी दिले़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १३ मार्चपासून लागू झाला आहे़ या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाºयांना सक्षम प्राधिकारी नेमले आहे़ या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील बायोमेट्रीक पध्दतीचा वापर असलेले सर्व आधार केंद्र ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत़जिल्हा रुग्णालय सज्जदरम्यान, शहरातील जिल्हा रुग्णालयात सुरु केलेल्या तीस खाटांच्या विलगीकरण कक्षात आवश्यक ते साहित्य आणि पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा आहे़ आॅक्सिजन आहे़ निधी प्राप्त झाला तर व्हेंटीलेटर खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एम़ पी़ सांगळे यांनी दिली़ संशयावरुन तपासणीसाठी येणाºया रुग्णांना माणुसकीची वागणूक देवून समुपदेशन केले जाईत असे ते म्हणाले़

टॅग्स :Dhuleधुळे