मनपाच्या विकास कामांचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:30 IST2019-11-12T22:29:24+5:302019-11-12T22:30:10+5:30
रस्त्यासह भुमिगत गटार : खड्डे ठरताय अपघाताला कारण

dhule
धुळे : शहरातील अपवाद वगळता सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारकांना खड्ड्यांसह धुळीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधीतून २६ रस्त्यांचे कामे केली आहे़ मात्र कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़
लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्याआधी मनपाकडून भुमिगत गटारीसह २६ रस्त्यांच्या कामांना सुरूवात केली होती़ मात्र या निवडणूकीनंतर विधानसभेची आचार संहिता संपृष्ठात आल्यानंतर देखील विकास कामे मार्गी लागलेले दिसुन येत नाही़ महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असतांना नगरोत्थान अंतर्गत सुमारे ९२ रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. आता सत्ता परिवर्तनानंतर राज्य शासनाने सुमारे १०० कोटी रुपयांचा निधीला मंजूरी देण्यात आली होेती़ त्यात नगरोत्थान योजनेतून कामांना देखील समावेश होता़ महापालिकेच्या विशेष महासभेत नगरसेवकांनी सूचित केल्याप्रमाणे २६ कामांचा प्रथम प्रस्ताव तयार करण्यात आला होता़ मात्र पाच महिन्यापाासून २६ रस्त्याचे कामे सुरू आहे़ मात्र अद्याप एकही कामे शंभर टक््के पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे़
या रस्त्यांचा आहे समावेश
नगरोत्थान अंतर्गत साधारणपणे १२ ते ३० मीटरच्या आतील रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने वाखारकरनगर बोर्ड ते राजेंद्र सुरी बोर्डपर्यंत रस्ता, वाडीभोकर रोडवर नेहरु चौक ते वाडीभोकर गावापर्यंत, पेठ ग.नं. ४, ५, ६, ७ नगरपट्टी ते जमनालाल बजाज रस्ता, ग.नं.१ ते आग्रारोडपर्यंत, साक्रीरोड ते अमरधाम तनेजा यांच्या घरापर्यंत, समतानगर ते निसर्गोपचार केंद्रापर्यंतचा ३० मीटररोड, नकाणेरोड सावरकर पुतळा ते नगाव गावापर्यंत, जुने धुळे कानुश्री मंगल कार्यालय ते बर्फ कारखाना आॅक्सीडेशन पाण्याच्या टाकीपर्यंत, वरखेडीरोड रामी प्लॉट ते नाल्यापर्यंत, चक्करबडीर्रोड ते सुरत बायपासपर्यंत, ऐंशी फुटीरोड नटराज चित्रमंदिर ते वाखारकरनगर बाबूभाई पटेल यांच्या घरापर्यंत, सुरत बायपास ते गुरुद्वारापर्यत, लेनीन चौक ते धान्य गोदाम ते बायपासपर्यंत, इंदिरा गार्डन गीतानगर ते वाडीभोकररोड पेट्रोल पंपापर्यंत अशा शहरातील २६ रस्त्याचा समावेश आहे़
भूमिगत गटारी देखील अर्धवट
रस्ते कामासह भूमिगत गटारीचे देखील काम केली जात आहे़ मात्र गटारीसाठी चांगले रस्ते तोडण्यात आली आहे़ त्यामुळे प्रभागातील रस्त्यावर मातीचा ढिग पडून आहे़ त्यामुळे परिसरातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने माती- चिखलामुळे नागरिकांना वाहतूकीसाठी अडथडा निर्माण होत आहे़ महापालिका शासनाने युध्दपातळीवर कामे मार्गी लावण्याची गरज असल्याचे अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे़