शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांनी केला ‘कब्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:16 IST

मनपा । उपाय-योजना होत नसल्याचे नाराजी

धुळे : गेल्या काही वर्षापासून भटक्या कुत्र्यांसह मुख्य रस्त्यावर गुरांचा उपद्रवामुळे धुळेकरांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ महापालिकेकडून उपाय-योजना नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे़भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण होत नसल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांमध्ये प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. याचाच त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. गल्लो-गल्लीत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्लेही लोकांवर दिवसेंदिव वाढतच चालले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्यावरून चालणे भटक्या कुत्र्यांनी कठीण केले आहे. शहराच्या काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस चोरांसारखे भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक धावू लागतात. यामुळे अपघातही घडले आहेत. दहा वर्षात वाढलेल्या श्वानांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़गुरांची समस्या वाढलीशहरातील पाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात गुरे बिनदिक्कतपणे फिरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते. त्यात गायींचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर फिरतात. चौकात भाजीपाला विक्रेते असल्याने भाजी विक्रेते उरलेला भाजीपाला तेथे फेकत असल्याने येथे जनावरांची गर्दी होते. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात येते़ त्यानतंर गुरांच्या मालकावर कारवाई केली जाते़वाहतुक कोंडीचा मनस्तापशहरातील मुख्य रस्त्याच्या मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी सकाळ- संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होते़

टॅग्स :Dhuleधुळे