आठ कुटूंबांचे शेतात स्थलांतरमाझे कुटूंब माझी जबाबदारी : आणखी स्थलांतर शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:11+5:302021-03-29T04:22:11+5:30
अनेक कुटुंबांनी स्वतःची सुरक्षा म्हणून शेतात आपले कुटुंब हलविले आहेत. वाघापूर, गोकुळ नगरी येथील कुटुंबांनी देखील कोरोनापासून सुरक्षा म्हणून ...

आठ कुटूंबांचे शेतात स्थलांतरमाझे कुटूंब माझी जबाबदारी : आणखी स्थलांतर शक्य
अनेक कुटुंबांनी स्वतःची सुरक्षा म्हणून शेतात आपले कुटुंब हलविले आहेत. वाघापूर, गोकुळ नगरी येथील कुटुंबांनी देखील कोरोनापासून सुरक्षा म्हणून शेतात स्थलांतर केले.
जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने केलेल्या तपासणीत १५२ पैकी १२ जण कोरोना बाधित निघाले. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे रुग्ण कदाचित बाहेर फिरतील अशी भीती असल्याने
आखाडे येथील ८ कुटूंबांनी आपल्या शेतात स्थलांतर केले आहे. माजी सरपंच
रावसाहेब तोंगल ठाकरे व पोपटराव पुंडलीक ठाकरे यांनी शेतात स्थलांतर केल्याची माहिती
माजी उपसरपंच शिवलाल ठाकरे यांनी दिली. त्यांनी
गावकऱ्यांना सुचित केले होते ज्यांची शेतात व्यवस्था असेल त्यांनी शेतात राहण्यास जावे. त्यानुसार लोक गेलेत. अजून काही कुटुंब शेतात राहण्यास जाण्याच्या तयारीच्या असल्याचे नमूद केले आहे.