भाेई समाजाची बैठक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:31+5:302021-02-10T04:36:31+5:30

धुळे : महाराष्ट्र प्रदेश भोईसमाज हितरक्षक दल संघटनेची बैठक झाली. संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोरे (अमरावती) यांनी मार्गदर्शन केले. ...

The meeting of the Bhai Samaj is in full swing | भाेई समाजाची बैठक उत्साहात

भाेई समाजाची बैठक उत्साहात

धुळे : महाराष्ट्र प्रदेश भोईसमाज हितरक्षक दल संघटनेची बैठक झाली. संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोरे (अमरावती) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष रमेश मोरे, स्वप्नराज खेडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा फुलपगारे यांनी केले.

पलाश नहार सीए परीक्षेत उत्तीर्ण

धुळे : नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत पलाश आनंद नहार हा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आहे. तो आग्रारोडवरील नहार फर्निचरचे मालक आनंद अशोक नहार यांचा मुलगा आहे. त्याला के. यू. नाबरिया व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फरशी पुलावर पथदिवे लावावेत

धुळे : शहरातील कालिकामाता मंदिरापासून देवपूर भागाकडे जाण्यासाठी नागरिकांना फरशी पुलावरूनच जावे लागते. मात्र या पुलावर पथदिवे नसल्याने, रात्रीच्या वेळी अंधार असतो. पुलावर खड्डे पडलेले असल्याने, रात्रीच्या वेळी नदीपात्रात पडण्याची भीती असते. त्यामुळे या पुलावर पथदिवे बसवावेत, अशी मागणी आहे.

ग्रामीण भागात गुटखाविक्री सुरू

शिरपूर : गुटखाविक्रीला बंदी असतांनाही तालु्क्यातील ग्रामीण भाग तसेच पाड्यांवर गुटखा विक्री जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या पाड्यांवर याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी

शिंदखेडा : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात सारखी वाढ होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झालेले आहे. केंद्र शासनाने पेट्रोलचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी वाहनधारकांनी केले आहे.

विनापरवाना लावलेले फलक काढण्यात यावेत

धुळे : शहरात विनापरवाना फलक लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. वर्दळीच्या चौकात काहीजण वाढदिवस, होणारे कार्यक्रम यांचे मोठ-मोठे फलक लावत असतात. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असून, या फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनापरवाना फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

धुळे : शहरातील पारोळा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच खासगी वाहनेही याच रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी.

वरिष्ठ महाविद्यालये लवकर सुरू करा

साक्री : शासनाने पाचवी ते १२वीपर्यंतचे शाळा, महाविद्यालये सुरू केेलेली आहेत. मात्र अद्याप वरिष्ठ महाविद्यालये सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शासनाने वरिष्ठ महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे.

आधार अपडेट केंद्र सुरू करावीत

धुळे : कोरोनापूर्वी जिल्ह्यात आधारकार्ड अपडेट केंद्र अनेक ठिकाणी होती. मात्र आता त्याची संख्या कमी करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक योजनेसाठी आधारची गरज असल्याने, ते अपडेट असणे गरजेचे आहेत. त्यामुळे अपडेट केंद्राची संख्या वाढविण्याची गरज आहे

नवीन वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव

पिंपळनेर : शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. चौहुदिशांनी नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. मात्र नवीन वसाहतींमध्ये अजुनही सुविधांचा अभाव आहे. गटारी नसल्याने पाणी रस्त्यावरच सोडावे लागत असून, येथेही सुविधा देण्याची गरज आहे.

Web Title: The meeting of the Bhai Samaj is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.