शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्यातील शहिदांना धुळे जिल्ह्यात आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:37 IST

‘एक दिवा शहिदांसाठी’ कार्यक्रम, मेणबत्ती पेटवून शहिदांच्या आठवणींना दिला उजाळा

आॅनलाइन लोकमतधुळे : मुंबई येथे ११ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धुळ्यात ‘एक दिवा शहीदांसाठी’हा उपक्रम राबविण्यात आला.२६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्यात नागरिकांसह अनेकजण शहीद झाले होते. या शहीद जवांनाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.धुळेमनुश्री प्रतिष्ठान व धुळे जिल्हा खान्देश विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील बाफना हायस्कूलजवळ ‘एक दिवा शहीदांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मेणबत्ती पेटवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील, सुनील देवरे, प्रकाश बाविस्कर, डॉ. संजय सोनवणे, अतुल सोनवणे, कल्पना वाघ, जयश्री शहा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिरपूरयेथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य पी.व्ही.पाटील, पर्यवेक्षक प्रदीप पाटील, एस.आर. देसले उपस्थित होते़तसेच एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ़एस़एऩ पटेल, कुलसचिव रोहित रंधे, उपप्राचार्य डॉ़महेंद्र पाटील, उपप्राचार्य दिनेश पाटील, आदी उपस्थित होते.कोडीद(ता.शिरपूर)येथे २६/११ च्या आंतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी डॉ.हिरा पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पावरा, पोलीस पाटील भरत पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, नटराज पावरा, कनवर पावरा, कांतीलाल पावरा, मुकेश ईशी, प्रमोद इशी, किरण डिवरे, अशोक पावरा, राजू सोनवणे, सनी पावरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे