पहिली प}ी असताना दुसरीशी विवाह

By Admin | Updated: April 28, 2017 01:12 IST2017-04-28T01:12:39+5:302017-04-28T01:12:39+5:30

15 जणांवर गुन्हा : विवाहितेची फिर्याद

Marriage in the first place | पहिली प}ी असताना दुसरीशी विवाह

पहिली प}ी असताना दुसरीशी विवाह

नंदुरबार : पहिली प}ी हयात असताना  दुस:या महिलेशी विवाह करणा:या युवकासह 15 जणांविरुद्ध नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सर्व पुणे येथील रहिवासी आहेत.
नंदुरबार येथील कंजरवाडा भागात राहणारी वंदना संदीप बागडे (28) या महिलेचा विवाह संदीप सावंत बागडे, (रा.उजलगाव, पुणे) यांच्याशी झाला होता. यादरम्यान, 13  मार्च 2016 रोजी संदीप सावंत बागडे यांनी शीतल सुरेश इंद्रेकर यांच्याशी दुसरा विवाह केला. याबाबत वंदना यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संदीप सावंत बागडे, शीतल सुरेश इंद्रेकर, सावंत पिस्त बागडे, चमणबाई सावंत बागडे, भानुदास सावंत बागडे, र}ाबाई फिलीप बागडे, शशिकांत दिलीप बागडे, लक्ष्मीबाई भानुदास बागडे, सुरेश विलास बागडे, महेंद्र जीवन बागडे, अनिल भटू नेवलेकर, मुमताज सुरेश इंद्रेकर, चेतन सुरेश इंद्रेकर, संतोष सुरेश इंद्रेकर, सतीश सुरेश इंद्रेकर (सर्व रा.उजलगाव, पुणे)  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marriage in the first place