उज्ज्वला चेतन भदाणे (रा. तऱ्हाडी) ही माहेरून घरखर्चासाठी १ लाख रुपये आणत नसल्यामुळे सासरची मंडळी छळ करीत होती़ ११ मे २०१८ पासून ८ दिवसांनंतर ते २८ जानेवारी २०१९ पर्यंत सासरी चोपडा व पुणे येथे आरोपीच्या घरी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता़ विवाहितेस हाताबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून तिला माहेरी हाकलून दिले़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}या त्रासाला कंटाळून तिने पती चेतन देविदास पाटील, सासरा देविदास धमनराव भदाणे, सासू नीलिमा देविदास भदाणे, गोपाल भगवंत पाटील, दीपक भगवंत पाटील सर्व राहणार संजीवनी कॉलनी, यावल रोड, चोपडा अशा ५ जणांविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़