शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे ज्ञान देणारी ंधुळे जिल्ह्यातील मांडळची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 21:37 IST2020-01-20T21:37:19+5:302020-01-20T21:37:38+5:30
डिजीटलच्या माध्यमातून दिले जाते शिक्षण

शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे ज्ञान देणारी ंधुळे जिल्ह्यातील मांडळची शाळा
आॅनलाइन लोकमत
धुळे : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी तालुक्यातील मांडळ येथील जिल्हा परिषद शाळेत ‘माझे स्टेशनरी दुकान’ हा उपक्रम राबविला जातो. ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम राबविला जातो. विशेष म्हणजे विद्यार्थीच या दुकानाचा सर्व हिशोब ठेवत असतात. त्यामुळे ही शाळा आदर्श ठरलेली आहे.
धुळे तालुक्यातील मांडळ या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असून, शाळेत १३० विद्यार्थी आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक कार्यरत आहेत.
शिक्षण घेत असतांंना विद्यार्थ्यांना विविध साहित्य लागत असते. मात्र खेडेगावात ते वेळेत उपलब्ध होत नाही. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनीच शाळेला कपाट खरेदी करून दिले. सर्व शालेय साहित्य देखील घेऊन दिले. शालेय साहित्य मिळाल्याने, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वस्तू शाळेतच उपलब्ध होत असतात. ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम राबविला जातो. चौथीचे विद्यार्थीच या सर्व स्टेशनरीचा हिशोब ठेवत असतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे ज्ञानही मिळत असते. शाळेत तृप्ती राजूरकर, योगेश धात्रक, आशा धलपे, चेतन भदाणे हे शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. शाळा डिजीटल असल्याने, तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते.
शाळेत वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. शाळेत परसबाग असून, त्याची देखभाल स्वत: विद्यार्थी करीत असतात. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.