VIDEO : धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, सहा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 12:35 IST2019-08-31T11:10:12+5:302019-08-31T12:35:15+5:30

Dhule Chemical Factory Blast : स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे परिसर हादरला असून फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या काही घरांची पडझड झाल्याचे समजते.

major explosion at chemical factory in dhule, maharashtra | VIDEO : धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, सहा जणांचा मृत्यू

VIDEO : धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, सहा जणांचा मृत्यू

धुळे : शिरपूरमधील वाघाडी येथे असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाघाडी येथील एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटाची माहिती समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच, स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे परिसर हादरला असून फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या काही घरांची पडझड झाल्याचे समजते.

स्फोटामुळे मोठी आग लागली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, फॅक्टरीत काही कामगार अडकले आहेत, त्यांनाही बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या स्फोटातील जखमींना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, या घटनेतील मृतांच्या आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: major explosion at chemical factory in dhule, maharashtra