मोहीम यशस्वेसाठी आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहा. आयुक्त विनायक कोते, तुषार नेरकर, पल्लवी शिरसाठ, मनपा अभियंता कैलास शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, ओव्हरसियर चंद्रकांत उगले, पी.डी. चव्हाण, सी.सी. बागुल, हेमंत पावटे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता एन.के. बागुल, आरोग्य विभागाचे लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव आदींचे सहकार्य लाभले.
या मोहिमेच्या समारोपप्रसंगी नगरसेविका मदिना पिंजारी, हीना पठाण, नगरसेवक सदाम खान, आसिम मोमीन, शब्बीर पिंजारी, आमिर पठाण, सहायक आरोग्यधिकारी पाटील, स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे, अख्तर शेख, फरीद बेग, सुपरवायझर मुजाहिद अन्सारी, मंजूर सय्यद उपस्थित होते. आगामी काळातही महापालिका प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असेल. त्यासाठी सर्व नगरसेवकांसह अधिकारी व कर्मचारी सर्वतोपरी सहकार्य करतील, असे सभापती बैसाणे यांनी सांगितले.
अनेकांच्या सोडविल्या तक्रारी...
गेल्या काही दिवसांपासून सभापती आपल्या दारी मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेच्या समाराेपप्रसंगी सभापती सुनील बैसाणे म्हणाले की, शहरातील प्रभाग क्र. १ ते १९ मध्ये संबंधित प्रभागातील नगरसेवक तसेच प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन जागेवरच नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या. यावेळी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेसाठी मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींचे सहकार्य मिळाल्याचे सभापती सुनील बैसाणे यांनी सांगितले.