शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST

धुळे : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तब्बल ५० ...

धुळे : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तब्बल ५० रुपये केले होते; मात्र आता पुन्हा हे दर कमी करून १० रुपये प्लॅटफॉर्म तिकीट केलेले आहे. त्यामुळे नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांसोबत त्यांच्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी होत असते. कोरोनाकाळात स्थानकावर होणारी गर्दी टाळावी यासाठी हे तिकीटदर ५० रुपये केले होते. त्यामुळे अनेकजण रेल्वेस्थानकावर येईनासे झाले होते; मात्र रेल्वेने प्लॅटफॉर्मचे तिकीट पूर्ववत केल्याने दिलासा मिळाला.

वर्षभर बसत होता आर्थिक भुर्दंड

पश्चिम रेल्वे मार्गावरील दोंडाईचा, शिंदखेडा ही त्या मानाने लहान रेल्वे स्थानके आहेत. या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र कोरोना काळात जे लोक प्लॅटफॉर्म तिकीट काढत होते, त्यांना मोठा भुर्दंड बसत होता. आता हे दर कमी केल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटाला प्रतिसाद कमी

धुळे जिल्ह्यात नरडाणा, दोंडाईचा व शिंदखेडा ही तीन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

दोंडाईचा, शिंदखेड्यालाच काही जलद गाड्या थांबत असतात. नरडाण्याला एकही जलद गाडी थांबत नाही

दोंडाईचा, शिंदखेडा येथे रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट कोणी काढत नाही. दिवसभरात दोन-तीन जणच प्लॅटफॉर्म तिकीट काढत असतात.

सुरू असलेल्या रेल्वे

सुरत-वाराणसी एक्स्प्रेस

चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस

उधना-अमरावती पॅसेंजर

सुरत-भुसावळ पॅसेंजर

सुरत-भागलपूर एक्स्प्रेस

तपासणी करण्याची आवश्यकता

लहान रेल्वे स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य असते. त्यामुळे सर्वच स्थानकावर तिकीट तपासनीसांची संख्या वाढविण्याची गरज आहे.