नेर : टंचाईचा काळ असल्याने पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते़ परंतु आता पाणी सोडणे बंद केल्यामुळे दुथडी भरुन वाहणारी पांझरा नदी आता कोरडी ठाक दिसत आहे़ दरम्यान नदीत सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे अनेक गावांसह गुरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता़पंधरा दिवसापासून पांझरा नदीपात्रात अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़ उन्हाची तीव्रता वाढल्याने तसेच कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वामुळे परिसरातील नागरीक आणि जनावरे यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जिकरीचा असल्याने पाण्याची मागणी वाढली होती़ नदी काठावरील सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचे जलश्रोत हे पाझंरा नदीकाठ असल्यामुळे सर्व जलस्त्रोत आटल्याने पाण्याची तिव्र टंचाई या गावातील नागरिकांना उद्भभवत होती. यासाठी नदीकाठच्या गावांनी पाणी सोडण्याची मागणी देखील केली होती़ त्यानुसार १ हजार ७२५ दशलक्ष घनफूट जलसाठा होता. त्यातून ४०० क्युसेक जलसाठा सोडण्यात आला़ आवर्तन सोडण्यासाठी पांझरा नदीकाठावरील गावातील नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधी व नेरचे सरपंच शंकर खलाणे तसेच नदीकाठावरील गावातील सर्व सरपंचांनी मागणी केल्यामुळे पांझरा नदी पात्रात आवर्तन सोडण्यात आले होते़ नदी दुथडी भरुन वाहत होती़ मात्र, अक्कलपाडा धरणातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने पांझरा नदी कोरडी झालेली दिसुन येत आहे़ नेर जवळील सुरत नागपुर महामार्गावरुन जातांना पांझरा नदी अशी कोरडी दिसुन येत आहे़
‘अक्कलपाडा’तून आर्वतन सोडणे बंद दुथडी भरून वाहणारी ‘पांझरा’ कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:48 IST